ETV Bharat / bharat

रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, चारजण जखमी, सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही

Rameswaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे हा बंगळुरू येथील प्रसिद्ध कॅफे आहे. तेथे आज (दि. 1 मार्च) रोजी दुपारी स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत चारजण गंभीर जखमी असून इतरही काही लोक जखमी झाले आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 3:05 PM IST

Updated : Mar 1, 2024, 8:01 PM IST

बंगळुरू/कर्नाटक Rameswaram Cafe Blast : बंगळूरच्या व्हाईटफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील जखमींमध्ये तीन कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पिशवीत ठेवलेल्या वस्तूचा स्फोट झाला. या स्फोटानंतर व्हाईटफिल्ड क्षेत्राचे पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले. हे ठिकाण बंगळूरमधील सर्वात प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे.

परिसराची नाकांबदी : आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याचा कॉल आला होता. आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि आम्ही तिथली परिस्थिती पाहिली. बचावकार्य सुरू आहे अशी माहिती अग्निशमन केंद्राने दिली आहे. तसंच, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस अधिकारी करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सध्या पोलिसांनी स्फोट नेमका कसा झाला याचा तपास सुरू केला असून, या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

अनोळखी व्यक्तीने ठेवली बॅग : प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने एक बॅग कॅशियर काऊंटवर ठेवली आणि काही वेळाने या बॅगेचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आईईडी ब्लास्ट आहे. बॅगेत एक आईईडी वस्तू मिळाली आहे, ज्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलिसांनी तात्काळ परिसरात तपास सुरू केला. इतर ठिकाणी कोणतीही वस्तू सापडली नसल्याची माहिती आहे. दहशत निर्माण करण्यासाठी या व्यक्तीने स्फोट घडवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जखमींवर उपचार : आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास रामेश्वर कॅपेत कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यानंतर आसपासच्या परिसरात धूर पसरला. स्फोटाची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी उच्च अधिकारी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला.

काऊंटरवरुन टोकन घेतलं : मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी स्फोटाबाबत माहिती दिली. हा मोठा स्फोट नव्हता. पोलीस चौकशी करत आहेत. सुदैवाने स्फोटात जीवीतहानी झाली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या व्यक्तीने कोणत्या उद्देशाने स्फोट घडवला याची माहिती अद्याप लागली नसून, पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेत शिरला त्यानंतर त्याने काऊंटरवरुन टोकन घेतलं आणि तिथेच बाजूला आपली बॅग ठेवली.

तपास सुरू : कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वरम यांनी स्फोटामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरु असल्याचं सांगितलं. पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब स्कॉडने घटनास्थळाची पाहणी केली असून, स्फोटाचे काही सॅम्पल गोळा केले आहे. लवकरच आम्ही यामागे कोण आहे याचा शोध घेऊ असं डॉ. जी परमेश्वरम यांनी सांगितलं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांपैकी कोणीही गंभीर नसल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे. पूर्ण माहिती मिळल्यानंतर स्फोटामागे काय उद्देश होता याची माहिती देऊ असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

1 ट्रेनमध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांची टोळी, हैदराबाद रेल्वे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

2 'जेएनयु'च्या सेंटरमध्ये मध्यरात्री 'लेफ्ट-राइट' राडा; अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

3 हिमाचल प्रदेश आमदार अपात्र प्रकरण : विक्रमादित्य सिंह यांनी घेतली अपात्र ठरलेल्या आमदारांची भेट

Last Updated : Mar 1, 2024, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.