भुवनेश्वर Puri Sri Mandir Gate Opened : ओडिसात भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर आपल्या जाहिरनाम्यातील वचन पूर्ती केली आहे. ओडिसात मोहन माझी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच जगन्नाथ पुरी मंदिराचे चार दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी प्रभू जगन्नाथाची मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळानं पूजा केली. तब्बल 5 वर्षानंतर जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे उघडल्यानं भाविक मनोभावे प्रभू जगन्नाथांचं दर्शन घेत आहेत. प्रभू जगन्नाथांचं दर्शन घेत येत असल्यानं भाविक सुखावले आहेत.
जगन्नाथ मंदिराचे दरवाजे होते बंद : मोहन माझी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार ओडिसा राज्यात सत्तेवर येताच, त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात दिलेलं वचन पूर्ण केलं. तब्बल 5 वर्षानंतर मंदिराचे चार दरवाजे उघडण्यात आले. जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे मार्च 2020 पासून बंद होते. कोविड निर्बंधानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला. मंदिरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनं भाविकांना मंदिराच्या सिंहद्वारातून प्रवेश करण्याची परवानगी दिली. कोविड निर्बंध उठवण्यात आल्यानंतरही मंदिराच्या सिंहद्वारातून भाविकांना प्रवेश दिला गेला. मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी अनेकदा बाविकांनी निदर्शनं केली. मात्र राज्य सरकारनं दखल न घेतल्यानं भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
भाजपा सरकार सत्तेवर येताच वचन केलं पूर्ण : मंदिराचे दरवाजे बंद केल्याचा मुद्दा भाजपानं निवडणुकीत गाजवला. भाजपा सत्तेवर येताच मंदिराचे दरवाजे खुले करण्याचं वचन भाजपा नेत्यांनी दिलं होतं. त्यामुळे मोहन माझी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होताच, भाजपानं आपली वचनपूर्ती केली. ओडिशात मोहन माझी यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी मंदिराचे 4 दरवाजे भाविकांसाठी खुले करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मंदिराचे चार दरवाजे उघडण्यात आले. मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी शू स्टँड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी घेतलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा :