ETV Bharat / bharat

नक्षलविरोधी पथकाला मोठं यश; जवानांनी 5 जहाल नक्षलवाद्यांना ठोकल्या बेड्या - Naxalites Arrested In Bijapur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 2:10 PM IST

Naxalites Arrested In Bijapur : नक्षलवाद विरोधी पथकानं 5 जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या नक्षलवाद्यांपैकी एका नक्षलवाद्यावर 1 लाख रुपयाचं बक्षीस सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं.

Naxalites Arrested In Bijapur
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

रायपूर Naxalites Arrested In Bijapur : छत्तीसगड राज्याला नक्षलवाद्यांचा गड मानलं जाते. मात्र नक्षलवाद विरोधी पथकाला नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवताना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद विरोधी पथकानं विजापूर इथं 5 नक्षलवाद्यांना पकडण्यात शनिवारी यश मिळवलं. या जहाल नक्षलवाद्यांमध्ये एका नक्षलवाद्यावर 1 लाख रुपयाचं बक्षीस होतं. साई मंगू उर्फ ​​मंगू कुंजम (45), महेश कुरसम (28), लालू पोटम (32), फुली पुनम (29) आणि धन्नू पुनम (35) अशी पकडण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.

मेटापाल जंगलातून पकडण्यात आले नक्षलवादी : या जहाल नक्षलवाद्यांना गंगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील मेटापाल गावाच्या जंगलातून पकडण्यात आलं. यात साई मंगू उर्फ ​​मंगू कुंजम (45), महेश कुरसम (28), लालू पोटम (32), फुली पुनम (29) आणि धन्नू पुनम (35) या जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांना मेटापाल गावाजवळील घनदाट जंगलातून पकडण्यात आलं. यातील कुंजम बंदी घातलेल्या नक्षलवादी चळवळीच्या 'जनता सरकार' पथकाचा प्रमुख म्हणून सक्रिय आहे. त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

या जहाल नक्षलवाद्यांचा अनेक गुन्ह्यात सहभाग : अटक करण्यात आलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांनी यापूर्वीही अनेक नक्षलवादी गुन्हे केले आहेत. या पाचही जणांनी पोलीस जवानांवर हल्ला, खून, खुनाचा प्रयत्न, आयईडी स्फोट आदी घटना करण्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासह या जहाल नक्षलवाद्यांनी अनेक घातपाती कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचंही यावेळी अधिकारीऱ्यांनी स्पष्ट केलं. नक्षलग्रस्त बस्तर परिसरात सुरक्षा दलांकडून नक्षलविरोधी कारवाई करण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी अनेक जहाल नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. छत्तीसगड सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ‘नियाद नेल्लानार’ आणि ‘पुना नार्काम मोहिमे’तून अनेक जाहल नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आत्मसमर्पण करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मोठी बातमी! गडचिरोलीत सी 60 जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन जवान जखमी - Gadchiroli Naxal Attack
  2. नक्षल नेत्यानं 28 वर्षांच्या हिंसक प्रवासाला दिला पूर्णविराम; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात - Giridhar With Wife Surrender
  3. लोकसहभागातून प्रगतीची नांदी, नक्षलींच्या बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी - Gadchiroli Naxalites News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.