नवी दिल्ली Bengal Loksabha Elections : सौमित्रा खान बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार आहेत. सुजाता मंडल आणि सौमित्र खान यांचं पती-पत्निचं नात आहे. मात्र, सध्या ते विभक्त आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सौमित्र खान यांना विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेव्हा सुजाता मंडल यांनी पती सौमित्र यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. पण 2022 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे जोडपं वेगळं झालं.
'पती-पत्नी दोघं एकमेकांविरोधात' : सुजाता मंडल (Sujata Mondal) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सौमित्र खान (Soumitra Khan) यांनी सुजाता यांना घटस्फोट दिला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सौमित्र खान यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते. आता हे काही दिवसांपूर्वी पती-पत्नी असलेले दोघं एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) लढवत आहेत.
'24 तास 365 दिवस बिष्णुपूरच्या परिसरात असणार' : तिकीट मिळाल्यानंतर सुजाता मंडल म्हणाल्या, 'माझ्या नेतृत्वाला माहीत आहे की, मी 24 तास 365 दिवस बिष्णुपूरच्या परिसरात असणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत. मला विश्वास आहे की बिष्णुपूर लोकसभेचे लोक यावेळीही माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला आशीर्वाद देतील असं त्या म्हणाल्या आहेत.
'मी आपली माफी मागते' : सुजाता मंडल म्हणाल्या की, सौमित्र गेली 5 वर्षे खासदार होते. मात्र, येथील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. माझ्यावर विश्वास ठेऊन लोकांनी सौमित्र यांना मतदान केलं. परंतु, माझी ती चूक होती. त्याबद्दलल मी आपली माफी मागते. मात्र, यावेळी मी स्वत: उमेदवार आहे. आपण मला निवडून द्याल ही अपेक्षा आणि मला विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
तृणमूलवर जोरदार टीका : भाजपाचे बिष्णुपूर लोकसभा उमेदवार सौमित्र खान म्हणाले, 'तृणमूल माझ्या विरोधात कोणत्याही दुसऱ्या राजकीय व्यक्तीला उभं करू शकत नाही, कारण त्यांना माहीत आहे की, ते हरणार आहेत (Tmc Vs Bjp). त्यामुळे सुजाता यांना उमेदवारी दिली आहे असं म्हणत त्यांनी तृणमूलवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, बिष्णुपूरमध्ये पुन्हा कमळ फुलणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कधीकाळचे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात : 1 जुलै 2016 रोजी बिष्णुपूर लोकसभा खासदार सौमित्र खान आणि बराजोरा येथील रहिवासी सुजाता मंडल यांचा प्रेमविवाह झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सौमित्र यांनी तृणमूल सोडले आणि भाजपामध्ये प्रवेश केला. न्यायालयाच्या निर्बंधांमुळे सौमित्र खान आपल्या मतदारसंघाला भेट देऊ शकत नसल्याने, सुजाता यांनी पतीच्या वतीने प्रचार केला होता. आता हेच कधीकाळचे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा :
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल
2 इलेक्टोरल बाँड योजनेत एसबीआयला मोठा धक्का, उद्यापर्यंत माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3 इलेक्टोरल बाँड योजनेत एसबीआयला मोठा धक्का, उद्यापर्यंत माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश