ETV Bharat / bharat

बदलापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा; राहुल गांधींनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप - Badlapur School Girl Incident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 8:19 PM IST

Updated : Aug 21, 2024, 8:50 PM IST

Congress on Badlapur case : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या घटनेविराधात काँग्रेस पक्षानं मंत्रालयावर धडक मोर्चा काढलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्स मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय.

Congress Dhadak Morcha
काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा (Source - ETV Bharat)

मुंबई Congress Dhadak Morcha : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं राज्यात संतापाची लाट पसरली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा (Source - ETV Bharat Reporter)

मंत्रालयाच्या दिशेनं जाणारा मोर्चा पोलिसांनी अडविल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या नेत्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, आमदार अमीन पटेल, आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नाही : यावेळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की एसआयटीची घोषणा या सरकारकडून केली जाते. मात्र, कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत, असं बोलायला सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नाही का? कोलकाता येथील घटनेचा भाजपाचा निषेध म्हणजे राजकारण नाही का" असा संतप्त सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केला."

सरकार मात्र झोपा काढतंय : "बदलापूरमधील दोन शाळकरी चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्राची मान देशात शरमेनं खाली गेली आहे. दोषींवर कडक कारवाई करा. कोणालाही सोडता नये. शाळेत विद्यार्थिनी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सरकार मात्र झोपा काढतंय. बदलापूरच्या पीडीत कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचार दिसत नाहीत. पण, न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली जातेय," असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

राहुल गांधींचा संताप : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, "पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील मुलींवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय आहे. गुन्हा दाखल करण्यासाठीही आंदोलन करावं लागणार का? पीडितांना पोलीस स्टेशनपर्यंत जाणंही इतकं अवघड झालं आहे का? न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. महिलांना सुरक्षित राहता यावं, यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत? याचा विचार सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांनी केला पाहिजे."

  • कोणीही राजकारण करू नये : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "बदलापूरमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला सोडलं जाणार नाही. त्या संदर्भात सरकारकडून एसआयटीची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळं यात कोणीही राजकारण करू नये."

हेही वाचा

  1. "घटनांमध्ये होणारी वाढ पाहता जागरुक राहा,"- बदलापूर घटनेनंतर रुपाली चाकणकरांचा पालकांना सल्ला - Minor Girls Sexual Assault Case
  2. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक नाही? - minor girl abuse cases
  3. "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका...", बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्ट मत - Badlapur School Case

Last Updated : Aug 21, 2024, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.