ETV Bharat / bharat

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना: यूपीमध्ये अलर्ट, लखनौमध्ये कलम 144 लागू, तर अयोध्येला जाणारा रस्ता बंद - 22 जानेवारी

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसंच अयोध्येला जाणारे मार्ग वळवण्यात आले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 10:32 AM IST

लखनौ Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत लखनौमध्ये नियोजित निषेध स्थळाव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी परवानगीशिवाय निषेध आणि निदर्शने आयोजित केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसंच 22 जानेवारीला अयोध्येचा रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. अयोध्येच्या मार्गांवर 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय लखनौमधील 25 संवेदनशील भागात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

लखनौचे सह पोलीस आयुक्त उपेंद्र कुमार अग्रवाल यांनी निर्देश दिले आहेत की, रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि 25 जानेवारी- हजरत अली जयंती, 26 जानेवारी-प्रजासत्ताक दिन, 14 फेब्रुवारी-बसंत पंचमी, 24 फेब्रुवारी-संत रविदास जयंती, 26 फेब्रुवारी-शबे बारात आणि 8 मार्च रोजी महाशिवरात्री आदी उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक पाहता, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि विविध आंदोलकांच्या निषेधामुळे शांतता भंग पावू शकते. त्यामुळेच लखनौमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

आदेशात काय म्हंटलंय : पोलिसांच्या परवानगीशिवाय पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेली कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा गट तयार केला जाणार नाही, तसंच कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरचा जास्त आवाजात वापर करता येणार नाही. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च इत्यादी धार्मिक स्थळांवर लावलेले लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रवर्धन धार्मिक स्थळाच्या परिसरापुरते मर्यादित असेल. नमाज, पूजा, मिरवणूक किंवा अन्य प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल. तसंच आवश्यकता असल्यास यासाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.

लखनौमधील 25 संवेदनशील भागात पोलीस तैनात : अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या लखनौमधील 25 संवेदनशील भागांमध्ये 300 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. याशिवाय लखनौ-अयोध्या रस्ता, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि शॉपिंग मॉलवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनं रविवारी (21 जानेवारी) रात्री 8 वाजल्यापासून अयोध्येकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. लखनौमार्गे अयोध्या, गोरखपूर, आझमगड येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आजपासून डायव्हर्जन निश्चित करण्यात आले आहे.

बस स्टँड आणि शॉपिंग मॉल्सही रडारवर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीपर्यंत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शॉपिंग मॉल, रेल्वे लाईनच्या 100 मीटर परिसरात तपासणी केली जात आहे. तसंच संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.

ग्रीन कॉरिडॉर तयार : 21 आणि 22 जानेवारीसाठी अमौसी विमानतळ ते शहीदपथ, कामटा, अयोध्या मार्ग, सुलतानपूर रोड ते पूर्वांचल एक्स्प्रेस वे आणि किसान पथ हे ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आले आहेत. या मार्गांवर ई-रिक्षांना बंदी घालण्यात आली असून, ऑटो, टेम्पो, बस यासह कोणत्याही प्रवासी वाहनांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. या तिन्ही मार्गांवर क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून कोणतेही वाहन बिघडले तर ते क्रेनच्या सहाय्याने तात्काळ काढले जाईल.

विशेष सुरक्षा :

  • चौक, सआदतगंज, ठाकूरगंज, घंटाघर, दुबग्गा, वजीरगंज, अमीनाबाद, मौलवीगंज, कैसरबाग, काकोरी, महिलाबाद या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
  • अयोध्येकडे जाणाऱ्या मार्गांवर असलेल्या दुकानांच्या बाहेर वाहने नसतील.
  • या मार्गांवर सत्तर दुचाकींवरून पोलीस सतत गस्त घालणार आहेत.
  • मार्गात कुठेही अडथळा निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

अयोध्येच्या मार्गांवर 4 हजार पोलीस तैनात :

  • 4 डीसीपी
  • 6 एडीसीपी
  • 14 एसीपी
  • 90 निरीक्षक
  • 580 उपनिरीक्षक
  • 2181 हेड कॉन्स्टेबल
  • 189 महिला कॉन्स्टेबल
  • 04 मोबाईल पोलीस वाहन
  • 70 दुचाकी

अतिरिक्त फोर्स :

  • 3 अतिरिक्त एस.पी
  • 16 निरीक्षक
  • 56 उपनिरीक्षक
  • 750 प्रशिक्षण उपनिरीक्षक
  • 320 हेड कॉन्स्टेबल
  • 18 महिला कॉन्स्टेबल

हेही वाचा -

  1. देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू; घाऊक संघटनेकडून 14 हजार लाडूंचे होणार वाटप
  2. अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती, राम गीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना
  3. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी जागवली लतादीदींची आठवण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.