ETV Bharat / bharat

गुन्हे शाखेचं पथक अरविंद केजरीवालच्या घरी पोहोचलं, वाचा काय आहे प्रकरण? - केजरीवालांना ईडीचे पाचवे समन्स

AAP MLAs horse trading Case : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी अचानक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलं. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या खरेदीच्या आरोपाप्रकरणी क्राइम ब्रँचचं अधिकारी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.

AAP MLAs horse trading Case
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 11:01 PM IST

नवी दिल्ली AAP MLAs horse trading Case : अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपा 'आप'च्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना आखात असल्याचा आरोप केजरीवाला यांनी केलाय. यासंदर्भात त्यांच्या सात आमदारांशीही संपर्क साधण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचं प्रकरणात क्राइम ब्रँचचं अधिकारी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.

भाजपाकडून आमदार फोडीचे प्रयत्न : दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला, की भाजपा आम आदमी पार्टीच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यांचे सात आमदार फोडण्याचा प्रयत्न झालाय. योग्य वेळ आल्यावर ऑडिओ क्लिप रिलीज करू, असं आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. या प्रकरणी दिल्ली पोलीस क्राइम ब्रँच आतिशी यांना नोटीसही पाठवू शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

आम आदमी पार्टीच्या आरोपांवर भाजपाचा पलटवार : दिल्ली भाजपानं केजरीवालांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम आदमी पक्षाला भाजपानं कथितपणे संपर्क केलेल्या आमदारांची नावे उघड करण्यास सांगितलं आहे. दिल्ली भाजपाचे सचिव हरीश खुराना यांनी आतिशी यांना भाजपानं संपर्क केलेल्या आमदारांची नावं उघड करण्याचं आव्हान दिलं आहे. भाजपाचे म्हणणं आहे की, 'आप' पक्ष, असे बेताल आरोप करून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.

दारू घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीचे पाचवे समन्स : दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीनं पाठवलेल्या समन्सला सूडाची कारवाई असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी, ईडीनं 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर, 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवलं होते. परंतु ते हजर झाले नव्हते.

ईडीच्या समन्सवर केजरीवाल काय म्हणाले? : ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, ते प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहेत, परंतु ईडीचे समन्सही पूर्वीच्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत त्यांनी ते मागे घेण्याची मागणी केली होती. मी माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगत आहे. माझ्याकडं लपवण्यासारखे काही नाही, असं केजरीवालांनी म्हटलं होतं.

हे वचालंत का :

  1. झारखंडमधील सत्तासंकट सुटेना! सत्ताधारी आघाडीचे 40 आमदार हैदराबादमधील रिसॉर्टमध्ये ठोकणार तळ
  2. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
  3. मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर उपस्थित केला प्रश्न; वाचा नेमकं काय म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.