ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; 'आप' आज करणार देशभरात आंदोलन - ED Arrested Arvind Kejriwal

ED Arrested Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं अटक केली आहे. मात्र ईडीच्या या कारवाईविरोधात आम आदमी पक्षानं देशभरात भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं आवाहन आपचे निमंत्रक गोपाल रॉय यांनी केलं आहे.

ED Arrested Arvind Kejriwal
आपचे निमंत्रक गोपाल रॉय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 9:51 AM IST

Updated : Mar 22, 2024, 2:43 PM IST

नवी दिल्ली ED Arrested Arvind Kejriwal : दिल्ली दारु घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी देशभरात आज सरकारविरोधात आंदोलन पुराकलं आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या अगोदर देशभरात इंडिया आघाडीकडून भाजपाविरोधात आंदोलनाची राळ उठवण्याची तयारी आम आदमी पक्ष करत आहे. आम आदमी पक्षाचे निमंत्रक गोपाल रॉय यांनी याबाबतची माहिती दिली. गोपाल रॉय यांनी इंडिया आघाडीला या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल अटकेत : अंमलबजावणी संचालनालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणात ईडीनं ठपका ठेवला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवालांच्या घरी धाव घेतली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करत अरविंद केजरीवाल यांना अटक केलं.

अरविंद केजरीवाल यांची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्षानं अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज देशभरात आंदोलन पुकारलं आहे. आपचे निमंत्रक गोपाल रॉय यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी बोलताना आपचे निमंत्रक गोपाल रॉय म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांची अटक ही लोकशाहीची हत्या आहे."

देशभरातील भाजपा कार्यालयाबाहेर करणार आंदोलन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, तर कोणालाही अटक केली जाऊ शकते. देशातील नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकतो. आजपासून हा लढा सुरू झाला आहे. अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नाही, तर एक विचारधारा आहे. भाजपा 400 पारचा नारा देत आहे. मात्र भाजपाला 40 जागा मिळतील. मी देशातील नागरिकांना भाजपाच्या या हुकूमशाहीविरोधात देशभरातील भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे आवाहन करतो. आम्ही सकाळी दहा वाजता आम आदमी पक्षाच्या कार्यालयात दाखल होऊ. त्यानंतर भाजपाच्या मुख्यलयासमोर आंदोलन करण्यात येईल, असं गोपल रॉय यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. अरविंद केजरीवाल अटकेत ; 'हा लोकशाहीचा खून': विरोधी पक्षांचा सरकारवर हल्लाबोल - ED Arrested Arvind Kejriwal
  2. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक; 'आप'ची सर्वोच्च न्यायालयात धाव - ED Arrest Arvind Kejriwal

Last Updated : Mar 22, 2024, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.