विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत धर्माचार्याची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले, उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा... - cm uddhav thackeray marathi news
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदु विचारसरणीचे प्रमुख दावेदार होते. त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेच्या नशेत वाहून गेले आहेत. उद्धव ठाकरे हिंदुंना विसरून गेले आहेत. राज्यातील मतदार महाविकास आघाडी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नसल्याची, टीका विश्व हिंदू परिषदचे गुजरात केंद्रीय प्रांत धर्माचार्य अखिलेश्वर दासजी महाराज यांनी केली ( Akhileshwar Das Maharaj Criticized Cm Uddhav Thackeray ) आहे. तसेच, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकऱ्यांचे माहेरघर आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. विठ्ठल मंदिरासह देशातील इतर मंदिरही सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST