Video : पुराच्या पाण्यात घातला ट्रॅक्टर.. ट्रॉलीसह गेला वाहून.. पहा व्हिडीओ - Heavy Rainfall in Himachal

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 30, 2022, 6:05 PM IST

बादलखड ( हिमाचल प्रदेश ) : मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत (Heavy Rainfall in Himachal) आहे. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बड्डीलगतच्या बालदखड येथे पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी अडकला. त्यात तीन जण होते. यादरम्यान ट्रॅक्टरवर स्वार असलेले तिघे काही वेळ ट्रॉलीवर उभे होते. मात्र ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी होताच ते तिघेही नदीत कोसळले. यादरम्यान तिघांनीही हुशारी दाखवली आणि जोरदार प्रवाहात पोहत असताना पलीकडे (Tractor Swept Away In Balad Khad Baddi) गेले. तर ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेला. ट्रॅक्टर चालकाने बंदी असतानाही ट्रॅक्टर नदीत उतरवल्याचे स्थानिकांनी सांगितले. बड्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी दयाराम ठाकूर यांनी ट्रॅक्टर पाण्यात वाहून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, त्यावरील तीन स्थलांतरित कामगार पोहत पोहत नदीच्या पलीकडे गेले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.