The Burning Truck : अमरावती- नागपूर मार्गावर 'बर्निंग ट्रक'चा थरार.. काही क्षणात जाळून खाक.. - ऑइलच्या टँकरला आग
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : अमरावती नागपुर द्रुतगती महामार्गावर ( Amravati Nagpur Expressway ) शुक्रवारी रात्री ट्रकने पेट घेतल्यामुळे खळबळ ( truck caught fire ) उडाली. ट्रकला आग लागताच काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. पेटलेल्या ट्रकच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. ट्रक पेटल्यामुळे अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर खळबळ उडाली. पंधरा दिवसांपूर्वीही अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर अमरावती शहरालगत महादेव कोळी परिसरात तेलाने भरलेला टँकर पेटला ( Oil Tanker Caught Fire ) होता. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली होती. आता मात्र याच महामार्गावर रात्री ट्रक पेटल्याने महामार्गावर भीतीचे वातावरण होते. हा ट्रक नेमका कशाचा होता ही माहिती अद्याप कळू शकली नाही.