Missing Father: आनंदाचा धक्का! 24 वर्षानंतर वडिलांचा लागला शोध; मुलाला आनंदाश्रू अनावर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
भरतपुर (ओडिशा) - ओडिशातील एका गावात मानसिक स्थिती बिघडल्यामुळे सोमेश्वर दास यांनी घर सोडले. नातेवाइकांनी अनेक वर्षे त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही शोध लागला नाही. शेवटी नातेवाईकांनी सोमेश्वर दास यांना भेटण्याची आशा सोडली होती. कुटुंबाने सामाजिक रितीरिवाजानुसार २४ वर्षांनंतर त्यांना मृत समजून त्यांचे ब्रह्मभोजही केले. पत्नी पतीला मृत मानून विधवेसारखे जीवन जगू लागली. पण महिनाभरापूर्वी अपना घर आश्रमातून आलेल्या एका फोनने त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद भरला. माहिती मिळताच कटक येथील सोमेश्वर दास यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी आश्रमात पोहोचला अन् मुलाच्या आनंद आश्रूंचा एकच बांध फुटला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.