राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमच्या सहयोगी पक्षांच्या आमदारासह विरोधी पक्षाच्या तीन आमदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu newly elected President ) यांना मतदान केल्याबद्दल मी विरोधक आमदारांचेही अभिनंदन करतो. असं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ( CM Pramod Sawant ) यांनी केले आहे.गोवा - राष्ट्रपतीपदाच्या झालेल्या निवडणुकीत ( Presidential Election ) विरोधकांची तीन फुटल्याने भाजपच्या राष्ट्पतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू ( Draupadi Murmu newly elected President ) यांना गोव्यातून 40 पैकी 28 मते मिळाली. दरम्यान फुटलेली तीन मतं आपली नसल्याचा दावा काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गोव्यात विरोधकांची तीन मतं फुटली आहेत. तर 40 पैकी 28 मत एनडीएच्या पारड्यात तर बारा मते विरोधकांना मिळाली आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांची तीन मते एनडीएच्या पारड्यातआमदार संकल्प आमोणकर मत - राष्ट्रपतीपदाच्या झालेल्या निवडणुकीत विरोधकांची तीन फुटल्याने भाजपच्या राष्ट्पतीपदाच्य उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना गोव्यातून 40 पैकी 28 मते मिळाली. दरम्यान फुटलेली तीन मतं आपली नसल्याचा दावा काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर ( MLA Sankalp Amonkar ) यांनी केला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुरमु यांना गोव्यातून 40 पैकी 28 मत पडली असून विरोधकांना बारा मते मिळाली आहेत. भाजपकडे सहयोगी पक्षांचा मिळून 25 मत होती तर विरोधकांकडे 15 मतं. मात्र भाजपच्या पारड्यात 28 मत पडल्याने विरोधकांची तीन मतं फुटली आहेत. आमची अकरा ही मतं सुरक्षित काँग्रेस आमच्या अकराही आमदाराने विरोधी पक्षाला मतदान केले असून फुटलेली तीन मतं आपली नसून ती अन्य पक्षाची असल्याचा दावा काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. विधानसभेत आपले संख्या अकरा असून आमची अकराही मत सुरक्षित असल्याचा ते म्हणाले.आम्ही विरोधकांचं अभिनंदन करतो भाजप - आमच्याकडे भाजप अपक्ष व सहयोगी पक्षांचा 25 संख्या व असताना विरोधी पक्षातील आमदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून मतदान केले आहे. म्हणून आम्ही त्या विरोधी पक्षातील आमदारांचा अभिनंदन करतो .असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे ( State President of BJP Sadanand Sheth Tanawade ) यांनी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांचे ट्विटरच्यां माध्यमातून अभिनंदन - दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ( CM Pramod Sawant ) यांनीही नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुरमु ( Draupadi Murmu, newly elected President ) यांचे ट्विटरच्यां माध्यमातून अभिनंदन करून विरोधकांनी आपल्याला तीन मतं दिली आहेत. याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करून विरोधी पक्षाने ही आपल्यावर विश्वास दाखवल्याचं ते ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले.हेही वाचा : Droupadi Murmu Become President : द्रौपदी मुर्मू विजयी, मोदी-शाह जोडी पुन्हा हीट, एनडीएच्या बाहेरचीही मते मिळाली