Video : देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतार्ह भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या होर्डिंगवरून अमित शहांचा फोटो गायब - देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतार्ह होर्डिंग
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15709868-thumbnail-3x2-bjp-hording-amit-saha-photo.jpg)
नागपूर - मुख्यमंत्री पदाकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांचे नाव अंतिम झाले असताना अगदी शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय गेम केल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांसह जनमानसात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यागमूर्ती आहेत, त्यांनी पक्षहित सर्वात वर मानून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा त्याग केला अश्या आशयाचे बॅनर नागपुरात झळकले आहेत. मात्र, या बॅनरवर दिल्लीपासून तर नागपुर पर्यंतच्या भाजप नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र,अमित शहा यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आलेला नाही ( Amit Shah photo disappear from hoarding ). यामागे कार्यकर्त्यांच्या नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात माजी महापौर संदीप जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बॅनरवर लावण्यात आलेले फोटो हे प्रोटोकॉलनुसार लावण्यात आले असल्याचा दावा केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले आहेत.