Union Budget 2022 Reactions : शिक्षण डिजिटलकडे नेण्याचा चांगला प्रयत्न; मात्र..... - शिक्षण अभ्यासक सचिन जोशी - केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नाशिक
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Minister Nirmala Sitaraman ) यांनी 2022चा अर्थसंकल्प सादर केला. ( Union Budget 2022 ) यात शिक्षण क्षेत्राला चालना मिळावी यासाठी देशात डिजिटल युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांसाठी पीएम विद्या चॅनल सुरू करणार आहेत. वन क्लास वन चॅनलअंतर्गत प्रत्येक वर्गात टीव्ही असणार आहे. तसेच 2 लाख अंगणवाड्या मॉर्डन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार शिक्षण डिजिटलकडे नेण्याचा चांगला प्रयत्न करत आहे. मात्र, तरी अजून ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. याचा फायदा फक्त शहरी भागाला होणार आहे. तसेच ऑफलाईन शिक्षणासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे मत शिक्षण अभ्यासक सचिन जोशी मांडले आहे. ( Union Budget 2022 Reactions )