विद्यार्थ्याने बनविलेला 'बॅटरीवरचा रोबोट' पोहोचविणार कोरोनाग्रस्तांना औषधे - satara latest news
🎬 Watch Now: Feature Video
कराड (सातारा) - रयत शिक्षण संस्थेच्या ढेबेवाडी (ता. पाटण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आठवीमध्ये शिकणार्या अथर्व पाटील याने बॅटरीवर चालणारा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट रुग्णालयात तसेच गृह विलगीकरणात असणार्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, साहित्य पोहोचविण्याबरोबरच फरशीची सफाई देखील करू शकतो. रयत शिक्षण संस्थेने रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत घेतलेल्या वैज्ञानिक खेळणी व उपकरण स्पर्धेत या रोबोटला संस्था पातळीवर प्रथम क्रमांकही मिळाला आहे.