मुंबई महापालिकेवर रेडक्रॉसची विद्युत रोषणाई - Mumbai Municipal Corporation Red Cross
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - रेडक्रॉस मोहिमेस ज्यांनी जन्म दिला त्या जीन हेनरी यांचा 8 मे हा जन्मदिवस. 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस ही संस्था तब्बल दोनशे देशांमध्ये काम करते. नैसर्गिक संकटात अडकलेल्या गरजूंना निस्वार्थीपणे ही संस्था मदत करत असते. तसेच, युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना, हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत देखील करत असते. मुंबई महापालिकेच्या इमारतीवर याच दिवसाचे औचित्य साधून रेडक्रॉसची विद्युत रोषणाई करण्यात आली.