Republic Day 2022 : पुणेकरांचा अभिमान.. दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

By

Published : Jan 26, 2022, 4:33 PM IST

thumbnail

पुणे- प्रजासत्ताक दिनी पुण्यातील ( Republic Day 2022 ) अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंद दास यांना राष्ट्रपती पदक ( Presidential Medal To Pune Firefighters ) जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ४२ जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यापैकी एका जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि २ जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक ९ कर्मचाऱ्यांना आणि ३० कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदकांची घोषणा करण्यात आली. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत दादाराम रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले. हे त्यांचे दुसरे राष्ट्रपती पदक असून, २०१० मध्ये त्यांना पाहिले राष्ट्रपती पदक मिळाले होते. अवघ्या काही दिवसातच रणपिसे सेवानिवृत्त होणार आहेत. यानिमित्त ईटीव्ही भारतशी प्रशांत रणपिसे आणि आनंद दास यांनी केलेली खास बातचीत केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.