Yashomati Thakur : लोकांनी गाव का सोडले याची चौकशी करण्याचे आदेश : पालकमंत्री यशोमती ठाकूर - वस्तीला पाणी मिळत नसल्याने लोकांनी सोडले गाव
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. ( People Migrated From Village Due To Water Issue ) अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नसून, गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली ( Yashomati Thakur On People Migrated In Amaravati ) आहे. यापूर्वीही याच भागात अशाच प्रकारे स्थानिक राजकारणातून प्रकार झाला होता. मात्र, याबाबत आता जिल्हाधिकारी आणि पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यातून सत्य काय ते समोर येईल, असे ठाकूर म्हणाल्या आहेत.
TAGGED:
पालकमंत्री यशोमती ठाकूर