निसर्ग चक्रीवादळ : मुंबईच्या ससून डॉक परिसराचा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आढावा - निसर्ग चक्रीवादळ मुंबई न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप दाखवणारे सॅटेलाइट दृश्य हवामान विभागाने जारी केले असून हे वादळ पुढील काही तासांत ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वादळामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह पुणे आणि नाशिक विभागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान कोणत्याही क्षणी हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकू शकते, असे हवामान विभागाने सांगितले आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईतील ससून डॉकमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी...