VIDEO : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर - शरद पवार नागपूर विमानतळ विदर्भ दौरा
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून (बुधवार) चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. (Ncp chief Sharad on four days Vidharbh visit) आज नागपूर विमानतळावर त्यांचं आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आले. (Sharad Pawar at Nagpur Airport) मागील वेळी शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख सारथी म्हणून होते. यावेळीस अनिल देशमुखांना कोठडीत असल्याने पवारांसोबत राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सोबत असणार आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये पवार महत्त्वाच्या बैठका आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, विधान परिषद निवडणूक तसेच राजकीयदृष्ट्या हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पवारांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Nov 17, 2021, 4:51 PM IST