आमदार भास्कर जाधव यांचे पारंपारिक 'जाखडी नृत्य', पाहा व्हिडिओ... - आमदार भास्कर जाधव
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13335940-340-13335940-1634039021786.jpg)
रत्नागिरी - जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. आमदार भास्कर जाधव हेही तुरंबव या आपल्या गावी त्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री शारदामातेच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये पारंपारिक जाखडी नृत्य करतांना पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ग्रामदेवीसमोर गावातील ग्रामस्थ पारंपरिक जाखडी नृत्य सादर करत असतात. तुरंबवची ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात नवरात्रोत्सवात दररोज रात्री पारंपारिक जाखडी नृत्य सादर होते. भास्कर जाधव विशिष्ठ पेहरावात जाखडी नृत्यात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.