ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली! - भीमाशंकर मंदिर पूर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. २४ तासांपासून भीमाशंकर परिसरात पाऊसाची तुफान बँटिंग झाली आहे. मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून आलेले पाणी मंदिरात पोहोचले आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून मंदिरात आला आहे.