Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - corona bulletin 3 march 2021 update
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात 9 हजार 855 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यावर कोरोनाचे ढग आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, तमिळनाडू राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरूवात झाली असून लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडींचा घेतलेला आढावा.