अभिषेक बच्चन लीलावती रुग्णालयात, उजव्या हाताला गंभीर दुखापत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
मुंबई - बॉलीवुड एक्टर अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हे दोघेही काल रात्री लीलावती रुग्णालयाच्या बाहेर दिसून आले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी फॅन्स चिंता व्यक्त करू लागले. मात्र नंतर माहिती समोर आली की, अभिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अभिषेक बच्चन यांच्यावर यशस्वी उपचार झाले आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. अभिषेक बच्चन रुग्णालयांमध्ये दाखल आहेत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे हे समजताच, ऐश्वर्या राय-बच्चनदेखील आपली शूटिंग सोडून तात्काळ मुंबईत पोहोचल्या आणि अभिषेक बच्चन यांची भेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.