मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालू ट्रकला लागली भीषण आग - पालघर
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ट्रक जागीच जळून खाक झाला. ही घटना विरार हद्दीत खानिवडे टोल नाका येथील गुजरात लेनवर आज 4 वाजेच्या सुमारास घडली. हा 16 टायर असलेला ट्रक गुजरातच्या दिशेने जात होता. दरम्यान, धावतानाच ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रक पूर्णपणे जळाला आहे. दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली.