Nitesh Rane : कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला मारण्याचा डाव होता, आमदार राणेंचा विधानसभेत आरोप - कलानगर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 24, 2022, 11:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आपल्याला कोल्हापूरला नेण्यात आले. या दरम्यान छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात ( Government hospital of Kolhapur ) आपल्याला दाखल केले असता तेथे आपल्याला मारून टाकण्याचा डाव काही लोकांचा होता, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी आज विधानसभेत केला. कोल्हापुरातील डॉक्टरांनी आपल्याला सिटी ऍन्जिओग्राफी ( City Angiography ) करण्याचा आग्रह केला. मात्र, त्यावेळी माझा रक्तदाब कमी असल्याचे आणि रक्तशर्करेची पातळीही नियंत्रणात नसल्याच मला जाणवत होते. अशा वेळी तेथील डॉक्टरांनी मला सिटी ऍन्जिओग्राफी करण्याचा आग्रह धरला. मात्र, मी त्याला नकार दिला. त्यावेळी कलानगर परिसरातून काही फोन येत होते याची मला माहिती आहे. मला मारून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे माझ्या लक्षात आले. सिटी ऍन्जिओग्राफीसाठी शरीरात शाई सोडायला लागते. या शाईच्या माध्यमातून मला मारण्याचा डाव असल्याचे काही लोकांनी मला येऊन सांगितले. त्यामुळे मी एन्जोग्राफी केली नाही, असे नितेश राणे यांनी सभागृहात सांगितले. विरोधकांना मारून टाकायचे असा या सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोपही राणे यांनी यावेळी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.