Tiranga Rally In Srinagar : श्रीनगरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन, उपराज्यपालांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग; Watch Video

By

Published : Aug 13, 2023, 9:50 PM IST

thumbnail

श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आज (रविवार, १३ ऑगस्ट) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक लोकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत जम्मू - काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला. 'जम्मू - काश्मीरमधील तरुणांना तिरंगा प्रिय आहे. येथे तिरंगा फडकवायला कोणीही उरणार नाही, असा दावा करणाऱ्यांनी आजच्या रॅलीतील गर्दी पाहावी', असे मनोज सिन्हा म्हणाले. जम्मू - काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यास येथे राष्ट्रध्वज फडकावण्यास कोणीही उरणार नाही, असे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी अनंतनाग तसेच पुलवामामध्ये देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.