Superstitions in Hingoli अंधश्रद्धेचा कळस! हिंगोलीत सहा महिन्यांच्या चिमुरडीला देवी समजून दर्शनासाठी गर्दी - six month old girl Avatar of Goddess
🎬 Watch Now: Feature Video
काही केल्या अंधश्रद्धेच्या Superstitions in Hingoli प्रकाराला आळा बसत नाहीये. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे Superstitions at Kapadsingi in Hingoli सहा महिन्यांच्या चिमुकलिच्या कपाळावर लाल आणि पिवळसर रंग दिसत असल्याने तिला देवीचाच अवतार Avatar of Goddess in Kapadsingi समजला जात आहे. तिच्या दर्शनासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर येथे येणाऱ्या महिलांच्या अंगात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कपाळावरील हा रंग जास्तच गडद दिसत असून, याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे महिला या चिमुरडीला देवीचाच अवतार समजू लागल्या आहेत. चिमुरडीला बघण्यासाठी महिला वर्ग एकच गर्दी करीत आहे. येथे केवळ एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक दाखल होत आहेत. चिमुरडीची मोठ्या थाटात पूजा - अर्चा केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST