शिवसेना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? विजय शिवतारेंनी स्पष्टच सांगितलं - Shiv Sena

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 7:43 PM IST

पुणे Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिवसेनेचे नेते (शिंदे गट) विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आहे. शिवसेना आमचा पक्ष आहे. आम्हाला आमचा पक्ष टिकवायचा आहे. शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळं याच चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय. ते पुण्यात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींशी बोलत होते. जे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी तीन वर्षात केलं नाही, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं केलं आहे. राज्याच्या विकासात महाविकास आघाडीचं काय योगदान आहे? याबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती घ्यावी. त्यानंतर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारावेत, असं शिवतारे यांनी म्हटलंय आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.