16 MLA Disqualification Case : ...कोर्टाच्या निर्देशानंतर 16 आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची - उज्वल निकम - Supreme Court
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना काही स्पष्टीकरण द्यायचे आहे का?, अशी विचारणा केली आहे. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. 11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विधानसभेच्या सभापतींनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वाजवी वेळेत घेऊन योग्य चौकशी करावी, असे सुचवले होते. सर्वोच्च न्यायालयाने सभापतींनी 16 आमदारांच्या अपात्रतेची चौकशी सुरू केली का? या प्रकरणाचे पुरावे काय आहेत हे तपासण्यास सांगितले असावे, असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी म्हटले आहे. यावर विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया देखील अज्वल निकम यांनी दिली आहे.