Maharashtra Weather Update : राज्यात पुढील आठवडाभर मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता...तर विदर्भात आजही गारा पडण्याची शक्यता - विदर्भात आजही गारा पडण्याची शक्यता
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18391572-thumbnail-16x9-update.jpg)
पुणे कमी दाबाचा पट्टा हा पूर्व विदर्भापासून तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटकमधून उत्तर तामिळनाडू पर्यंत जातं आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तिथे गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात आजही गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवडाभर राज्यभर विविध ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, तर विदर्भात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर मध्यमहाराष्ट्र येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.तसेच मराठवाडा येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.आणि वीदर्भ येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.