Ganesh Visarjan 2023 : पुढच्या वर्षी लवकर या… मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

पुणे :  Ganesh Visarjan 2023 : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली. पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीला (Anant Chaturdashi Celebration In Pune) सुरूवात झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. यानंतर शंखनाद करत मनाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात (Tambadi Jogeshwari Visarjan Mirvnuk) झाली आहे.
 


मिरवणुकीत शंखनाद करण्यात आला : अतिशय भक्तिमय वातावरणात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला (Visarjan Mirvnuk) सुरूवात झाली आहे. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळकडून पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ पहेरावामध्ये शंखनाद करणारे कार्यकर्ते हे मिरवणुकीचे आकर्षण होते. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीत सतीश आढाव यांचा नगारा वादनाचा गाडा, समर्थ प्रतिष्ठान आणि ताल ढोल-ताशा पथकांचे वादन, चांदीच्या पालखीपुढे विष्णूनाद पथकाच्या वादकांचा शंखनाद होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ साकारला होता. न्यू गंधर्व ब्रास बँडचे वादक हनुमान चालीसा आणि मंगल अमंगल हारी या रामायण चौपाईचे वादन करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.