परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नागपूर दौऱ्यावर, रेशीमबागेत संघ कार्यालयात हजेरी - एस जयशंकर व्याख्यान
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 13, 2024, 6:21 PM IST
नागपूर : केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज (शनिवारी) नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरला आल्यानंतर त्यांनी थेट रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दीक्षाभूमी येथे हजेरी लावली आहे. (S Jaishankar Nagpur Tour) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर लेखक देखील आहेत. (Deekshabhumi) आज त्यांचं 'भारताचा भौगोलिक राजकारणातील उदय' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. त्याकरिता ते नागपूरला आले आहेत. (ReshimBagh)
भारताच्या भूमिकेवर मांडणार विचार : 'Bharat’s Rise in Geopolitics' या विषयावर ते आपलं मत व्यक्त करणार आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दीक्षाभूमी येथे गेले होते. जगभरात अत्यंत वेगानं घडत असलेल्या घडामोडीत भारताच्या विकसित होत असलेल्या भूमिकेवर ते आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. एस. जयशंकर हे परराष्ट्र व्यवहारांचे आणि भारतीय कूटनीतीचे तज्ज्ञ मानले जातात. (S Jaishankar Lecture)