Cobra in Tempo बाप रे बाप.. टेम्पो चालकाच्या सीटवर बसला भलामोठा कोब्रा साप.. मग झालं अस काही.. - Cobra in Ambernath
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे: विषारी कोब्रा नाग टेम्पो चालकाच्या सीटवर Cobra in Tempo फणा काढून बसल्याचे पाहताच चालकाने त्या नागाला पाहून टेम्पो सोडून धूम ठोकल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ एमआयडीसी भागातील एका लादी कारखान्यात घडली Cobra in Tempo At Ladi factory आहे. अंबरनाथ एमआयडीसी भागातील पेट्रोल पंप शेजारी एक लादी कारखाना आहे. या कारखान्यात मारबलची वाहतूक करण्यासाठी आज दुपारच्या सुमारास चालक टेम्पो घेऊन आला होता. त्यावेळी टेम्पोमध्ये मारबल भरताना चालक टेम्पोतुन खाली उतरला होता. मात्र मारबल टेम्पोत भरल्यानंतर चालकाने टेम्पोचा दरवाजा उघडताच त्याला सीटवर कोब्रा नाग फणा काढून बसल्याचे दिसताच त्याने टेम्पो सोडून पळ Ladi factory in Ambernath MIDC area in Thane काढला. त्यानंतर काही कामगारांनी या कोब्रा नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला असता हा नाग चालकाच्या सीट खाली अडगळीत बसला होता. कारखाना मालकाने कोब्रा नाग टेम्पोत शिरल्याची माहिती सर्पमित्र राहुल कदम याला दिली. काही वेळातच सर्पमित्र राहुल घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला सीट खालून पकडण्याचा प्रयत्न करीत होता. नागाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र राहुलला अर्धातास अथक प्रयत्न करावे लागले. त्यानंतर कोब्रा नागाला सीट खालून काढल्यानंतर त्याला एका पिशवीत बंद केल्याने चालकासह कारखान्यातील कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग इंडियन कोब्रा जातीचा अंत्यत विषारी असून साडे फूट लांबीचा Venomous cobra snake आहे. या कोब्रा नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने आज सायंकाळी निर्सगाच्या सानिध्यात सोडून सर्पमित्र राहुलने त्याला जीवनदान दिले Cobra in Ambernath आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST