Chandrayaan 3 : नर्तिका पूजा हिरवाडे यांचे 'चंद्रयान' गीतावर भरतनाट्यम, पाहा व्हिडिओ - चंद्रयान गीतावर भरतनाट्यम
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 23, 2023, 12:11 PM IST
नागपूर : चंद्रयान मोहिम 3 यशस्वी व्हावी म्हणून सर्वच भारतीय प्रयत्न करत आहेत. यात सामान्य नागरिक आणि कलाकारांचाही समावेश आहे. नागपूर येथील भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना पूजा हिरवाडे यांनीही अशाच प्रकारे प्रर्थना केलीय. त्यांनी आज 'नमो नमो भारताम्बे' आणि 'चंद्रयान' गीतावर भरतनाट्यम सादर केलंय. आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरण्यासाठी सज्ज झालंय. पूजा हिरवाडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, भारताचं चंद्रयान-३ आज चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. त्यामुळं हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी मी चंद्रयान गीतावर भरतनाट्यम सादर केलंय. संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. ज्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीने आज हे शक्य झाले आहे, त्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. (Pooja Hirwade Bharatanatyam on song Chandrayaan)