चंदा मामा दूरचे नसून आता चंदा मामा टूरचे, देशभरात एकच जल्लोष

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 11:01 PM IST

thumbnail

नागपूर : भारताचे चंद्रयान 3 आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरवले. आजचा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचवेल असाच होता. भारतीय म्हणून आम्हाला शास्त्रज्ञांचा सार्थ अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रिया नागपूर येथील खगोल प्रेमींनी दिली आहे. भारताने आज घडवलेल्या इतिहासाची जगातील कोणताही देश सहजासहजी पुनरावृत्ती करू शकेल असं वाटत नाही, असंही नागरिकांनी म्हटलं आहे. चंद्रयान 3 आज यशस्वीपणे लँडिंग करेल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री होती. चंदा मामा दूरचे नसून आता चंदा मामा टूरचे असल्याच्या भावना देखील नागरिकांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे आम्हाला भारतीय वैज्ञानिकांनाचा अभिमान वाटतो, अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी अनेकांनी चंद्रयान 3 मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.