Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर 'या' मुद्द्यावरून केला आरोप - Chandrakant Patil accused
🎬 Watch Now: Feature Video

प्रत्येक घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी गेले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी हर घर नल से पाणी योजना Har Ghar Nal Se Pani Yojana आणली. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना या योजनेसाठी आलेला पैसा हा लुटण्याचा प्रकार झाला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी केला आहे. अगोदरची योजना ही उत्तम प्रकारे सुरू असताना देखील 1300 नव्या योजना महविकास आघाडी सरकारने आणल्याचे पाटील यांनी म्हंटले असून या सर्व योजनेबाबत जिल्हापरिषद सीईओकडून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत श्वेतपत्रिका काढावी यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे पत्र ही लिहणार असल्याचे म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST