Buldhana Bus Accident : एसटी बसचा अपघात; स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने गाडी पलटी, पाहा व्हिडिओ - Buldhana Bus Accident
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा : बसमधील बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. सवणा ते चिखली एसटी बसचा अपघात झाला आहे. गाडीचे स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने बसची पलटी झाल्याचे चालकाने सांगितले. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात चालक सुद्धा जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सात वाजेदरम्यान झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. आज सकाळी सवणा येथून बस क्र. एमएच 20 डी 9367 ही चिखली येथे जात हाेती. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. एसटी बस दुपारपर्यंत तिथून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेल्या एसटीत जवळपास 25हून अधिक विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचे दिसत आहे. या अपघातामुळे एसटी महामंडळाचा नादुरुस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे.