Corruption : एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना उपजिल्हाधिकाऱ्यासह दोघे ताब्यात
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - तब्बल एक लाख रुपयांची लाच शेतकऱ्याकडून स्वीकारतांना बुलडाण्याचे भूसंपादन विभागाचे ( Buldana Land Acquisition Department ) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे ( deputy district officer while accepting bribe ) यांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यासोबत या प्रकरणात लिपीक नागोराव खरात, मोताळा येथील वकील अनंथा देशमुख यालाही ताब्यात ( Two arrested along with sub-district officer ) घेण्यात आले. जिगाव प्रकल्पामध्ये ( Jigaon Project ) हिंगणा इसापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडीलांची जमीन भूसंपादीत करण्यात आली होती. मात्र, मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली होती. भूसंपादन विभागाची चुक दुरुस्त करण्यासाठी चक्क शेतकऱ्याकडेच लाचेची मागणी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST