Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेसच्यावतीने बाईक रॅलीतून जनजागृती - Awareness through bike rally
🎬 Watch Now: Feature Video
नंदुरबार भारत जोडो यात्रेच्या Bharat Jodo Yatra जनजागृतीसाठी नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोटर सायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्ते सहभागी झाले. राज्यात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्ह्यात भारत जोडो यात्रेबाबत जनजागृती केली जात आहे. आमदार तथा माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली दुर्गम भागात पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली होती. नवापूर येथे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. नवापूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवापूर शहरातून भारत जोडो यात्रेनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीनियर कॉलेजमधून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस भवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरून बाईक रॅली काढण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST