पश्चिमी राष्ट्रांप्रमाणे भारतातही कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञांकडून - maharashtra corona news
🎬 Watch Now: Feature Video
मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव अखेर नोव्हेंबर महिन्यात ओसरल्याचे चित्र आहे. मात्र देशात थंडी वाढल्यानंतर कोरोनाची लाट पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पश्चिमी राष्ट्रांमध्ये याला सुरुवात झाली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही त्याबाबत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याच अनुषंगाने कोरोनाची दुसरी लाट म्हणजे काय, तिचा देशासह राज्यावर होणारा परिणाम, याबाबत इंग्लंडमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्लाझमा थेरपी, कोरोना लस आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
Last Updated : Nov 19, 2020, 2:37 PM IST