क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला दिलासा नाही, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - ऑक्टोबर) क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी किल्ला न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकील यांच्यात जामीन अर्जावर न्यायलयात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज नाकारला. यामुळे आता आर्यनचे वकील जामिनासाठी सत्र न्यायालय म्हणजेच सेशन कोर्टात दाद मागणार आहेत. दरम्यान आर्यन खान याच्या सहित आठ जणांची जे जे रुग्णालयात मेडीकल चाचणी आणि rt-pcr टेस्ट करण्यात आली. यानंतर आर्यन सहित सात जणांना अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण घडामोडींचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी काशिनाथ महाडे यांनी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेरून घेतलेला हा आढावा....