VIDEO : विजयी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्या - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - भारत पाकिस्तान मॅच जर भारताने जिंकली तर त्याचा विजयी उत्सव साजरा करण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी पोलिस प्रशासनाने मागे घ्यावी अशी आता मागणी होत आहे. मराठी क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. एकीकडे संपूर्ण भारतीयांचे आजच्या भारत पाकिस्तान मॅचकडे लक्ष लागले आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच नेहमीच भारत जिंकत आला आहे. याचा सर्वजण जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करत असतात. असे असताना केवळ कोरोनाचे कारण पुढे करत आनंदोत्सव तसेच स्क्रीन लावण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचेही तोडकर यांनी स्पष्ट केले आहे.