मुंबईतील रस्त्यावर चालत्या कारला आग; पाहा व्हिडिओ - mumbai car fire news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मफतलाल चौक मरीन ड्राइव्ह येथे चालत्या गाडीला आग लागली. ही प्रवासी वॅगनार कार होती. सुरुवातीला गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. तत्परतेने स्वतः बाहेर निघत सोबत असलेल्या दोन प्रवाशांनाही बाहेर काढले. त्यानंतर क्षणार्धातच कारने पेट घेतला. पेट घेतल्यानंतर गाडीमधील असलेल्या सीएनजी किटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात एक पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.