घर बसल्या पर्यटकांना घडणार राणीच्या बागेची सफर - mumbai tourist place
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या काळामध्ये भायखळा येथील वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागलेला आहे. पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. घरात बसून बोअर झालेल्या पर्यटकांना मात्र आता घरातच राणीच्या बागेची सफर घडणार आहे.
द मुंबई झू या नावाने सोशल मीडियावर राणीच्या बागेला नवीन ओळख निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर द मुंबई झू या नावाने राणीचा बाग प्रशासनाकडून पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर दिवसभरातले प्राण्यांचे फोटोज, व्हिडिओ, गमतीशीर किस्से याची माहिती मिळणार आहे. तसेच या पेजवर वनस्पती, प्राणी, प्रजाती यांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना घरीच राणीच्या बागेत सफर घडणार आहे.