तुकडोजी महाराज महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी प्रेरणेच स्रोत - केंद्रीय मंत्री गडकरी - केंद्रीय मंत्री गडकरी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - तुकडोजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते देशासाठी एक प्रेरणेच स्रोत आहे. त्यांची भजन आपण कधी विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ते रविवारी (दि. 24) गुरुकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या समाधी व प्रार्थना मंदिराचे दर्शन घेतले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, तुकडोजी महाराजांनी जी प्रबोधन केले. तेच प्रबोधन सध्या त्यांचे भक्त गावोगावी पोहोचविण्याचे काम करत आहेत. तुकडोजी महाराज यांची 53 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मला दर्शन करण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने व भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री जिओ सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, पुष्पाताई बोंडे, डॉ. राजाराम बोथे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Last Updated : Oct 24, 2021, 8:57 PM IST