ताशी 110 वेगाने धावत होती रेल्वे, कंपनाने चांदणी स्टेशनचा एक भाग कोसळला - स्टेशन अधीक्षक कक्ष
🎬 Watch Now: Feature Video
बुऱ्हानपूर -नेपानगर पासून पाच किमी अंतरावर असलेल्या चांदणी रेल्वे स्थानकावर मोठी दूर्घटना टळली आहे. स्टेशनवरुन एक रेल्वे ताशी ११० किलोमीटर वेगाने धावली रेल्वे जाताच स्टेशन अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचा एक भाग कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी स्थानकावर जमा झाले. या दूर्घटनेमुळे काही वेळ रेल्वेचे वेळापत्रक बिघडले होते.