ETV Bharat / sukhibhava

World Sleep Day 2023 : चांगल्या आरोग्यासाठी आहे ६ तास झोप घेणे महत्वाचे, पुरेशा झोेपअभावी 'हे' होतात वाईट परिणाम

author img

By

Published : Mar 13, 2023, 11:40 AM IST

चांगली झोप घेणे व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र वेळेवर चांगली झोप न घेतल्यास अनेक व्याधीचा व्यक्तीला सामना करावा लागतो. त्यामुळे वेळेवर ६ तास झोप घेणे मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे.

World Sleep Day 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : सुदृढ आरोग्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही माणसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहू शकता. मात्र तमावामुळे तुम्हाला झोप आली नाही, तर थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही. काही नागरिकांना झोप येत नसल्याने हा त्यांच्यासाठी झोप ही डोकेदुखी ठरते. अशा नागरिकांना स्लीप एपनियाचा आजार जडतो. त्यामुळे वेळेवर झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. जगभरात १७ मार्चला जागतिक झोप दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त आरोग्यासाठी महत्त्व असलेल्या झोपेबाबतची माहिती, जाणून घ्या.

काय आहेत स्लीप एपनियाची कारणे : वेळेवर झोप न येण्याच्या त्रासाने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे झोपेसाठी काही नागरिकांना झोपेच्या गोळ्याचा आदार घ्यावा लागतो. मात्र तरीही काही नागरिकांना झोप येत नाही. झोपेच्या गोळ्या मानवी शरीरीवर विपरित परिणाम करतात. त्याचे अनेक साईड इफेक्टही आहेत. मात्र झोप न आल्याने काही व्यक्तींना स्लीप एपनिया या आजाराने ग्रासले जाते. त्यामुळे स्लीप एपनिया नेमके काय आहे आणि तो कशामुळे होतो, याबाबतची माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरते. स्लीप एपनिया होण्याची अनेक कारणे आहेत. घशात अडथळा आल्यामुळे शरीर श्वास घेण्यास मेंदूला सिग्नल पाठवते. मात्र मेंदू ते वाचू शकत नसल्यामुळे जटील समस्या निर्माण होतात. हे वारंवार घडल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यातून अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. वारंवार झोप न झाल्यामुळे स्मृतीभ्रंश होण्याची जास्त शक्यता असते. रक्तदाब, मधुमेह यासारके गंभीर आजाराचा सामना व्यक्तीला करावा लागतो. त्यामुळे थकवा जाणवून चिडचिड होते. चिडचिड झाल्यामुळे व्यक्तीच्या विचारक्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

निद्रानाशामुळे होतो विपरित परिणाम : निद्रानाश हा व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. त्यामुळे व्यक्तीची सतत चिडचिड होते. माणसिक तणावात असलेल्या व्यक्तीला निद्रानाश हा आजार ग्रासण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सकस आहार घेऊन नियमीत व्यायाम करणे, वेळेवर दररोज ८ तास झोप घेणे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे.

वजनावर अंकुश ठेवण्यासाठी वेळेवर झोप आहे महत्वाची : लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा हा स्लीप एपनियाला देखील जबाबदार आहे. लठ्ठपणामुळे श्वसनमार्गात अडथळा येऊ शकतो. फुफ्फुसात हवेचा आंशिक किंवा पूर्ण अडथळा आल्याने झोपेचा त्रास होतो. त्यामुळे तुमचे वजन जास्त असल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करा. त्यासह स्लीप एपनियाचा त्रास होत असल्यास, तुम्ही वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत.

नियमित करा व्यायाम : नियमित व्यायाम किंवा योगासने हा कोणत्याही आजारावरचा रामबाण उपाय आहे. व्यायामामुळे तुमची श्वसन प्रणाली मजबूत होते. स्लीप एपनिया हा आजार ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतो. लठ्ठपणामुळे तुमच्या फुफ्फुसातील ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम किंवा योगासने वजन कमी करण्यास आणि वेळेवर आरोग्यदायी झोप घेण्यास खूप मदत करू शकतात.

झोपण्याची स्थिती बदला : काही जणांची झोपण्याची स्थिती निद्रानाश होण्यास कारणीभीत ठरते. त्यामुळे झोपण्याची स्थिती बदलणे निरोगी झोप घेण्यास मदत करते. जर एखादी व्यक्ती पाठीवर झोपली तर श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही स्थिती बदलून त्या व्यक्तीने वाकडे झोपण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे होते नुकसान : जंक फूड, दारू आणि धूम्रपान यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दारू आणि धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. कोणतेही व्यसन तुमच्या झोपेवर परिणाम करतात. त्यामुळे स्लीप एपनिया होण्याचा धोका अधिक असतो. धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. त्यामुळे जास्त धूम्रपान केल्याने झोपेची पद्धत बिघडते. म्हणून व्यसनांचा त्याग करणे चांगले आहे. रात्रीच्या वेळी कॉफी टाळण्याचा देखील वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात.

हेही वाचा - World Glaucoma Day २०२३ : भारतातील 12 दशलक्ष नागरिकांची काचबिंदूने गेली दृष्टी, जाणून घ्या काय आहे हा आजार ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.