ETV Bharat / sukhibhava

जागतिक लैंगिक आरोग्य दिन २०२०

लैंगिक विषयावर जनजागृती करण्यासाठी दर वर्षी ४ सप्टेंबर रोजी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे 'कोविड १९ च्या काळात लैंगिक आनंद कसा घ्यायचा'. वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्सुअल हेल्थ ( डब्लूएएस ) ने त्यांच्या सर्व संघटनांना प्रत्येक ४ सप्टेंबर साजरा करायला सांगितला आहे. जगामध्ये लैंगिक आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग्य दिनाचे प्रयोजन केले जाते.

author img

By

Published : Sep 13, 2020, 12:44 PM IST

world-sexual-health-day-2020
जागतिक लैंगिक आरोग्य दिन २०२०

भारतात लैंगिक आरोग्याबद्दल बोलायला अजूनही लोक संकोचतात. भारतातल्या अनेक घरांमध्ये या विषयावर चर्चा करायला बंदीच आहे. पण आधुनिक युगात विचार बदलत आहेत. तरुण पिढीने लैंगिक विषयावर बोलायला सुरुवात केली आहे. विशेष करून डिजिटल, सोशल मीडियात जागृती निर्माण करण्यासाठी या विषयावर चर्चा सुरू आहे.

याच विषयावर जनजागृती करण्यासाठी दर वर्षी ४ सप्टेंबर रोजी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे 'कोविड १९ च्या काळात लैंगिक आनंद कसा घ्यायचा'. वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्सुअल हेल्थ (डब्लूएएस) ने त्यांच्या सर्व संघटनांना प्रत्येक ४ सप्टेंबर साजरा करायला सांगितला आहे. जगामध्ये लैंगिक आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग्य दिनाचे प्रयोजन केले जाते.

जागतिक आरोग्य संघटनांनी (डब्लूएचओ) नमूद केले आहे, 'लैंगिक आरोग्याकडे स्वीकारार्ह नजरेने पाहिले जाते, तेव्हा लैंगिकतेकडे आणि लैंगिक संबंधांकडे सकारात्मकता आणि आदरानेच पाहणे आवश्यक असते. त्यामुळे आनंददायी आणि सुरक्षित सेक्सचा अनुभव, सक्ती, भेदभाव आणि हिंसाचार नसलेले संबंध प्रस्थापित होतात. व्यक्ती, जोडपी आणि कुटुंब यांचे एकूण आरोग्य आणि समाज, देशाचा सामाजिक – आर्थिक विकास या गोष्टी मूलभूत आहेत.' म्हणूनच लोकांना, मग ते कुठल्याही लिंगाचे असोत, त्यांना लैंगिक इच्छा असतात आणि हे मानवी जीवनातला एक नेहमीचाच भाग आहे. हे सामाजिकदृष्ट्या स्वीकारायला हवे.

लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआयएस)

हे लक्षात ठेवायला हवे की लोकांना लैंगिक इच्छा असली तरी सुरक्षित सेक्स हे प्राधान्य असायलाच हवे. तुमच्या जोडीदाराबरोबर केलेल्या संभोगामुळे अनेक प्रकारचे सेक्सुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात रोज १ दशलक्षापेक्षा जास्त लैंगिक संक्रमित संसर्ग होतात. '३० पेक्षा जास्त वेगवेगळे बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी लैंगिक संपर्कामुळे संक्रमित होतात. यापैकी ८ विषाणूंमुळे मोठे लैंगिक संक्रमित आजार होतात.' ते आहेत -

  1. बरे होणारे - सिफिलीस, गोनोरिया (गरमी), क्लॅमिडीया आणि ट्रायकोमोनिआसिस
  2. असाध्य आजार - हिपॅटायटिस बी, हर्पेस सिम्पलेक्स विषाणू (एचएसव्ही किंवा हर्पस), एचआयव्ही आणि मानवी पेपिलोमाव्हायरस (एचपीव्ही)

‘विषाणू संसर्गामुळे उद्भवणारे असाध्य आजारांची लक्षणे उपचाराने कमी होऊ शकतात किंवा त्यात सुधारणा होऊ शकते.'

हे संसर्गजन्य आजार तोंडावाटे, योनीवाटे आणि गुदद्वारावाटे सेक्स केल्याने होतात. या संसर्गाव्यतिरिक्त असुरक्षित सेक्स केल्याने तरुणांमध्ये नको असलेले गर्भारपण लादले जाऊ शकते.

सुरक्षित सेक्स करायच्या काही टिप्स –

  • लैंगिक जोडीदारांची संख्या कमी असू द्या.
  • त्याला किंवा तिला तुमच्या आधीच्या सेक्स जीवनाबद्दल सांगा.
  • संभोग करण्याआधी तुमची आणि तुमच्या जोडीदाराची चाचणी करायला संकोच करू नका.
  • एचपीव्ही आणि हिपॅटायटिस बी यांची लस टोचून घ्या.
  • तुम्ही गुदद्वार, योनी किंवा तोंडावाटे सेक्स करत असाल तर दर वेळी कंडोम वापरा. यामुळे लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
  • कंडोमशिवाय स्त्रियांनी इतर गर्भनिरोधकांचा वापर करावा. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टळू शकते.
  • तुम्ही जोपर्यंत शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सेक्स करायला तयार होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध ठेवू नका.
  • साधने काळजीपूर्वक समजून घ्या आणि वापरा. लेबल नीट वाचा.
  • तुम्ही सेक्स टाॅयचा उपयोग करत असाल तर ती स्वच्छ आहेत ना याची खात्री करा.
  • तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर योग्य प्रकारे कुटुंब नियोजन करा.

म्हणून, निरोगी लैंगिकतेमुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित राहू शकतो. अजून तरी भारतीय शिक्षण व्यवस्थेत लैंगिक शिक्षण दिले जात नाही. पण मुलांबरोबर या विषयावर पालकांनी बोलताना टाळाटाळ करू नये. मोकळेपणा ठेवावा. तुम्ही तुमची लैंगिक इच्छा लपवून ठेवली तर तुम्हाला नैराश्य येऊ शकते. आयुष्यातली ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते निषिद्ध नाही. लैंगिक आयुष्याबद्दल बोलताना किंवा त्याबद्दल काही प्रश्न विचारताना कोणीही लज्जा बाळगू नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.